जनाबाई शिंदे यांचे निधन.
औसा प्रतिनिधी
औसा येथील जनाबाई क्षीरसागर शिंदे वय 75 वर्ष यांचे शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे रामभाऊ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील नागरिक नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या