राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
____________________
औसा प्रतिनिधी
दिनांक 25 मार्च 2025
औसा येथील माऊली प्रतिष्ठान आणि माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेत हरंगुळ (खु ) येथील ग्रामस्थांच्या वतीने विजेत्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच मनोहर झुंजे, माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. शिवरूद्र स्वामी, धनराज पाटील, उमाकांत भुजबळ, राजकुमार वाघमारे, विश्वनाथ झुंजारे आणि श्रीमंत पांचाळ या मान्यवरांच्या हस्ते रंजना पवार, सरिता जगताप, पदमिन राजुरे, भारतबाई मिरजे आणि पुष्पा पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या