शेतकरी चळवळीला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मांजरा परिवार
बाजूळगे गुरुजी,मा चेअरमन मारुती साखर
बेळकुंड :गेल्या चाळीस वर्षांपासून काळ्या मातीतल्या लेकरासाठी रस्त्यावरची लढाई लढताना या चळवळी जिवंत राहिल्या पाहिजेत म्हणून राजीव कसबे यांच्या सारख्या तरुणाला क्रांतिकारी शेतकरी चळवळीचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या राजेंद्र मोरे यांच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे उदगार संत शिरोमणी मारुती महाराज सह साखर कारखान्याचे मा चेअरमन श्री गणपत बाजूळगे गुरुजी यांनी काढले.शेतकरी,कष्टकरी, श्रमिक यांच्यामुळे भारत देशाची ओळख आहे, दुर्दैवाने सरकारचे चुकीचे धोरण हे आपले मरण ठरत आहे. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी होती परंतु आज ते संदर्भ बदलून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
संत शिरोमणी मारुती महाराज सह साखर कारखाना येथे ह भ प श्री कुमार पाटील महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रम प्रसंगी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदी राजीव कसबे यांची निवड झाल्याने त्यांचा सर्व संचालक मंडळ आणि कारखाना प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.यावेळी श्री बाजूळगे म्हणाले की राजीव कसबे हे ग्रामीण भागातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी अगदी महाविद्यालयीन जीवनापासून संपूर्ण राज्यात युवक,श्रमिक, वंचित, शेतकरी, मजूर, विधवा, दिव्यांग अशा दुर्लक्षित घटकाच्यासाठी काम करताना आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून प्रोत्साहित केले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री रविकांत तुपकर यांनी श्री कसबे यांची निवड केली असावी असा कयास मांडला. राजेंद्र मोरे सारखा लढवय्या माणूस पाठीशी असल्याने गरीबाच्या झोपडीपासून श्रीमंताच्या महालापर्यंत सर्वांशी संपर्क ठेऊन पुढील दिशा निश्चित करतील असा विश्वास आपल्या मनोगतात श्री बाजूळगे गुरुजी यांनी व्यक्त केला.
साखर उद्योग आणि शेतकरी यांचे नाते अतूट आहे त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यासोबत सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमितभैया देशमुख, मा आ धीरजभैय्या देशमुख असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले किंबहुना मांजरा परिवार अशा संघटना आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा मा मंत्री दिलीपराव देशमुख यांचा हवाला देत भूमिका विषद केली.
सत्कार सोहळ्यासाठी ह भ प कुमार पाटील महाराज,चेअरमन श्री शाम भोसले, व्हॉइस चेअरमन श्री सचिन पाटील शेतकरी नेते राजेंद्र आबा मोरे, मा चेअरमन गणपत बाजूळगे गुरुजी,जेष्ठ संचालक श्री शामराव पाटील, श्री माळी, ऍड बाबासाहेब गायकवाड, श्री सोनटक्के, श्री अनिल पाटील, कार्यकारी संचालक श्री बरमदे, भोसले साहेब, मोरे साहेब, एन एल सूर्यवंशी, घोडके साहेब आणि सर्व संचालक मंडळ विविध खाते प्रमुख कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या