येल्लोरी (टेंभी) येथे हमीभाव खरेदी केंद्रा अंतर्गत तुर खरेदी सुरुवात.

 येल्लोरी (टेंभी) येथे हमीभाव खरेदी केंद्रा अंतर्गत तुर खरेदी सुरुवात.



औसा(प्रतिनिधी) औसा तालुक्यातील येल्लोरी (टेंभी) येथे महाकिसान संघ व नाफेड यांच्या वतीने प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना तुरीची विक्री करण्यासाठी शासकीय ठरवलेल्या हमीभावानुसार रु.7550/- प्रति क्विंटल तुरी विक्री करण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर तुर विक्री करण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

तुरीची विक्री शासकीय हमीभावावरच होण्यासाठी शेतकऱ्यांना या केंद्रावर तुरी विकण्याचा विशेष लाभ मिळणार आहे.विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना हमीभाव प्राप्त होण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरत आहे.शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी २०२४-२५ या वर्षीच्या पिकांची ई-पिक नोंदणी असलेला सातबारा ८ अ, आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुकाची झेरॉक्स घेऊन शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर उपस्थित रहावे.तसेच येल्लोरी (टेंभी) येथील प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन शेख रियाज जाफरसाब यांनी या केंद्राचे संचालन सुरू करून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षणासाठी हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.शेतकऱ्यांना हा फायदा घेण्यासाठी शेख रियाज जाफरसाब यांच्या 9970160711 आणि 9881449465 या नंबरवर संपर्क साधता येईल.या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव मिळवण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना या केंद्रावरच तुर विक्री करण्याचे महत्त्वाचे आवाहन चेअरमन शेख रियाज जाफरसाब यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या