महात्मा फुले यांच्या 198 जयंती समितीच्या अध्यक्षपदी श्री गोपाळ सूर्यवंशी तर उपाध्यक्ष पदी विजय फुटाणे यांची निवड..*

 *महात्मा फुले यांच्या 198 जयंती समितीच्या अध्यक्षपदी श्री गोपाळ सूर्यवंशी तर उपाध्यक्ष पदी विजय फुटाणे यांची निवड..* 


औसा प्रतिनिधी

महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 198 व्या जयंती निमित्त आज नृसिहं मंदिर माळी गल्ली औसा येथे सर्व फुले प्रेमी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महात्मा फुले जयंती मोहत्सव समिती  2025 ची निवड करण्यात आली या समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळ खंडेराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्री. विजय रवींद्र फुटाणे, सचिव श्री प्रसाद बबन फुटाणे, सह सचिव श्री विशाल बालाजी फुटाणे, कोषाध्यक्ष श्री केदार संजय जोशी, मिरवणूक प्रमुख म्हणून श्री गणेश दिगंबर फुटाणे, श्री परमेश्वर हरिश्चंद्र फुटाणे, श्री पियुष गोपाळ म्हेत्रे, सजावट प्रमुख श्री नितीन माणिकराव सोनवळकर यांची नियुक्ती करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंती मोहत्सव निमित्त दिनांक 09 एप्रिल ते 11 एप्रील हे तीन दिवस विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये रक्तदान शिबीर, मुलांसाठी निबंध, भाषण स्पर्धा, व समाज प्रबोधन पर चित्रपट इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच या बैठकीवेळी सर्व समाज बांधव व फुले प्रेमींना मिरवणुकीमध्ये मद्यप्राशन करून कोणीही मिरवणुकीत येऊ नये या बाबत सूचना देण्यात आली जर कोणी आढळले तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे ठरले.  सदर बैठकीस माळी समाजचे अध्यक्ष श्री सचिन माळी , उपाध्यक्ष श्री चांगदेव माळी व इतर सर्व पदाधिकारी व माळी गल्ली व परिसरातील सर्व शेकडो फुले प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या