*आमदार मा.श्री. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते योगिता सावंत सन्मानित*...
औसा प्रतिनिधी
श्री शिवाजी महाविद्यालय किल्लारी येथे अकरावी सायन्समध्ये शिकणारी कुमारी योगिता नेताजी सावंत या विद्यार्थिनीने शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत व कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय *श्री.अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते कुमारी योगिता सावंत व पालक श्री नेताजी सावंत यांचा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी* येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सांगता समारोह व बक्षीस वितरण कार्यक्रमात शाल, पुष्पहार,ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. विशेष बाबम् हणजे योगिताने इयत्ता नववीमध्ये असतानाच कराटे ब्लॅक बेल्ट मिळविला असून तिसरी मध्ये असताना तिने एमटीएस परीक्षेत तालुक्यातून प्रथम व इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला असून यापूर्वीही आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2017-18 मध्ये *स्वच्छ औसा महोत्सव 2017- 18* या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान ही योगिताने पटकाविला होता.तसेच जिल्हास्तरावर विविध भाषण स्पर्धेत ही अनेक वेळा प्रथम येण्याचा मान पटकाविला होता. एवढेच नव्हे तर *राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम* येण्याचा बहुमान हे योगिताने 2020 मध्ये मिळविला होता.त्यावेळी *शिक्षक आमदार माननीय श्री विक्रमजी काळे साहेब* यांच्या शुभहस्ते योगितास सन्मानित करण्यात आले होते. तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत 98.60% गुण घेऊन उज्वल यश प्राप्त केले होते. तसेच इंग्रजी विषयात औसा तालुक्यातून प्रथम येण्याचा मान योगीताने पटकावला होता. त्यामुळे शाळेने व संस्थेने अनेक वेळा मान्यवराच्या हस्ते सन्मानित केले होते.*आमदार पवार साहेबांच्या हस्ते दुसऱ्यांदा सन्मानित होण्याचे भाग्य योगीतास लाभले.* ही कौतुकास्पद बाब आहे. योगिताच्या या कर्तबगारीची दखल घेऊन माननीय श्री अभिमन्यूजी पवार साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केले की योगितासारखे अभ्यास करून चांगले गुण तर मिळवाच पण निबंध स्पर्धा , भाषण स्पर्धा, जलतरण स्पर्धा, विशेषतः मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे शिकावेत तसेच पालकांनी मुलींना उच्च शिक्षण द्यावे व कराट्याचेही शिक्षण द्यावे व भारताचे पंतप्रधान *नरेंद्र मोदीजी* साहेबांचे *बेटी बचाव बेटी पढाव* अभियान यशस्वी करावे असे आव्हान आपल्या भाषणात उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक गण यांना केले. या सत्कार समारंभ प्रसंगी श्री शिवछत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट किल्लारी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गुंडाप्पा बिराजदार,संस्थेचे सरचिटणीस मा.श्री विजयकुमारजी सोनवणे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री बब्रुवानजी माने,इतर सर्व संचालक,पदाधिकारी,श्री शिवाजी कॉलेजचे प्राचार्य श्री शेख सलीम हुसेन, उपप्राचार्य मा.श्री रामजी सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक प्रा.शिंदे बी.एम.,वैभवजी सोनवणे,हिंदी विभाग प्रमुख शिंदे डी.व्ही.,सौ.प्रा.निला मॅडम,महाराष्ट्र विद्यालय किल्लारीचे माजी मुख्याध्यापक मा.सतीशजी भोसले,क्रीडा विभागप्रमुख मा.श्री सुभेदारजी सर किल्लारीच्या सरपंच व उपसरपंच ,भूतमुगळीचे सरपंच सतीशजी चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांतजी (बापू) चव्हाण, तानाजी चव्हाण,सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी,पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रेक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या