रमाई आवास योजनेच्या रक्कमेत वाढ करा:- *भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष* *बबलू गवळे यांची*" मागणी*

 रमाई आवास योजनेच्या रक्कमेत वाढ करा:-


*भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष* *बबलू गवळे यांची*" मागणी*


 लातूर प्रतिनिधी:-

 लातूर:- शासनाकडून रमाई आवास घरकुल योजना राबवली जाते .या योजनेसाठी  शासनाकडून दिला जाणारा  निधी हा आपुरा पढत असून.  यासाठी  ग्रामीण भागातील लाभार्थी साठी आडीच ते तीन लाख रुपये व शहरी भागासाठी पाच लाख रुपये ची वाढ करण्यात यावी असे अशाची निवेदन भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे यांनी  लातूर चे जिल्हाधिकारी याचे कडे मागणी केली आहे. गेली दोन वर्षा पूर्वी ही याच मागणीचे निवेदन देण्यात आले होते.तरी पण शासन दरबारी आद्यप पर्यंत कसलीच दखल घेतली नाही.

म्हणून स्मरण निवेदन दाखल केले आहे  बबलू गवळी यांनी आज रोजी  घरकुल बांधकामासाठी लागणारे मटेरियल हे अवाच्या सवा भाव वाढल्यामुळे  गोर गरीब जनतेला तूट  पुंज्या रक्कमेत घरकुल बांधून होत नाही त्यासाठी शासनाने महागाईचा विचार करून सदर  योजेनेच्या रक्कमेत वाढ करावी   अन्यथा या विरोध  तीव्र आंदोलने  व लाक्षणिक उपोषण ही करू असे निवेदनात नमूद केले आहे यावे निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे , जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, अशोक गायकवाड, मुकेश पवार, अविनाश कांबळे, रितेश सूर्यवंशी, रवी जगताप, रहीम शेख आदी कार्यकर्त्याच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या