सुप्रीम हुमन राईट इंटेलिजन्स इंडिया च्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार साठी विनायक मोरे यांची निवड
औसा-(प्रतिनिधी)दि
सुप्रीम हुमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार साठी दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी विनायक पांडुरंग मोरे यांची निवड झाली आहे. या संस्थेच्या वतीने दिनांक 2 मार्च 2025 रोजी नाशिक येथील एका भव्य कार्यक्रमांमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत एस बागल यांनी दिली आहे.
विनायक मोरे यांची महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, रिंगन लाईव्हचे संपादक राजू पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, उपाध्यक्ष बालाजी उबाळे आणि रोहित हंचाटे, पत्रकार विजय बोरफळे, रमेश दुरुकर, जयपाल ठाकूर, विलास तपासे, बालाजी उबाळे,विठ्ठल पांचाळ, एस ए काजी, एम बी मनियार, विवेक देशपांडे इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या