पुर्वी प्रमाणेच स्वत: बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अधिकार द्यावा-लोकसत्ता युवा संघटनेची मागणी..
लातूर प्रतिनिधी
इमारत व इतर बांधकाम कामगार हे कामासाठी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्याला जावे लागते त्याशिवाय त्यांचा घर-संसार चालत नाही, परंतु महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी नव्याने नोंदणी/नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधीत बांधकाम कामगारांनी आपल्या मुळ कागदपत्रासह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याची जाचक अटी लावल्यामुळे बांधकाम कामगारांचा मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान होणार आहे.
स्वतः बांधकाम कामगारांना घर बसल्या मोबाईल, कॉम्प्युटरवरुन कामागार कामाला जायच्या अगोदर किंवा कामावरुन रात्री घरी वापस आल्यानंतर स्वतः ऑनलाईन अर्ज करायचे व होणारे नुकसान टाळत होते. तसेच पुर्वी प्रमाणेच स्वतः बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अधिकार देण्यात यावा,अन्यथा लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या कार्यालयात दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिकः 10.00 वाजता पासून आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख यांनी मुंबई येथे जाऊन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना 2 जानेवारी 2025 रोजी निवेदन दिले आहे.या निवेदनावर लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या