औसा आगाराच्या वाहकास जबर मारहाण एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू.

 औसा आगाराच्या वाहकास जबर मारहाण एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू.



औसा प्रतिनिधी 


प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार सुरू असतो प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची सेवा ग्रामीण भागात सुरू असते परंतु प्रवाशाकडून अनेक वेळा एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांना त्रास होत असतो. दिनांक 16 जानेवारी रोजी औसा तालुक्यातील कोरंगळा येथे एसटी कर्मचाऱ्यांना आला 16 जानेवारी रोजी औसा ते बिरवली बस कोरंगळा गावात गेली असता येथील करण शिखरे आणि त्याचे साथीदार यांची औसा आगाराचे वाहक युवराज कांबळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. प्रवाशांना वाहक युवराज कांबळे हे व्यवस्थित बसण्यासाठी सांगत असताना करण शिखरे व त्याच्या साथीदारांनी बस वाहकास दगडाने बेदम मारहाण केली. मारहाणी मध्ये युवराज कांबळे यांना जबर मार लागला असून त्यांच्यावर मोरया हॉस्पिटल लातूर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अतिदक्षता विभागात असल्याचे कळते औसा आगाराचे वाहक युवराज कांबळे यांना बेदम मारहाण झाल्याच्या निषेधार्थ औसा आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी औसा आगारात काम बंद आंदोलन पुकारले या मारहाणीतील आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर  कार्यवाही करावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी औसा आगारात काम बंद आंदोलन केले. 17 जानेवारी 2025 रोजी औसा आगारातून एकही बस धावली नाही एसटी कर्मचाऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही असा पवित्रा औसा आगाराच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या