श्रीशैल्य मल्लिकार्जुन पिठाचे श्रीमद जगद्गुरु यांच्या हस्ते संपादक राजू पाटील यांना बसवरत्न पुरस्कार..
औसा प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा लिंगायत समाज व बसवरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा अत्यंत मानाचा बसवरत्न पुरस्कार दैनिक मनोगतचे झुंजार संपादक तथा रिंगण लाईव्ह चे निर्भिड संपादक राजू पाटील यांना 2025 सालाचा बसवरत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. उमरगा जिल्हा धाराशिव येथे झालेल्या अत्यंत देखण्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संपादक राजू पाटील यांना बसवरत्न गौरव पुरस्कार श्रीशैल्य मल्लिकार्जुन पिठाचे श्रीमद जगद्गुरु डॉक्टर पंडिता आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते व श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ फेटा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संपादक राजीव पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मागील 40 वर्षापासून आपल्या सिद्धहस्त लेखणीतून सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योग आर्थिक कृषी व व्यावसायिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडून प्रशासनाला धारेवर धरीत सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागावीत म्हणून प्रयत्न केला होता तसेच राजीव पाटील यांनी शंभर अग्रलेख सलग लिहून संवाद हे पुस्तक प्रकाशित केले होते. दैनिक मनोगतच्या माध्यमातून रिंगण या स्तंभाच्या माध्यमातून विपुल लेखन केले रिंगण लाईव्ह या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून अत्यंत अल्प कालावधीमध्ये दोन लाख सबस्क्राईब वरचा टप्पा पूर्ण करीत नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चांगले वार्ता वार्तांकन करून मतदान पूर्व चाचणीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेख विश्लेषण करीत निकालाचा अचूक अंदाज ही वर्तविला होता पत्रकारिता क्षेत्रासोबतच सलग 25 वर्ष मनोगत कला महोत्सवाची सांस्कृतिक चळवळ औसा शहरांमध्ये सुरू करून महाराष्ट्रातील वैभवशाली सांस्कृतिक चळवळीची परंपरा 25 वर्षे अखंडपणे चालविली या सर्व बाबींची दखल घेऊन धाराशिव जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि बसवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्था उमरगा यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार दिलीपराव सोपल, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बसवरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सनी पाटील, सचिव शिवकांत पतगे, बसव व्याख्याते राजेश्वर सोलापुरे, विश्वेश्वर पंचाक्षरी, काशी विश्वेश्वर मंदिराचे कार्यवाह बसवव्याख्याते किरण पुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपादक राजू पाटील यांना बसव रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल औसा तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या