मुस्लिम धर्मियांचा निलंगा येथे तब्लिगी उमुमी इज्तेमा संपन्न..
औसा प्रतिनिधी
मुस्लिम धर्मियांचा लातूर जिल्ह्याचा दोन दिवसिए तब्लिगी उमुमी इज्तेमा 30 डिसेंबर सोमवार, व 31 डिसेंबर मंगळवार रोजी निलंगा येथे आयोजित करण्यात आले होते.त्यानिमित्ताने
आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत
आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी
जोपासणे आवश्यक असून,
विश्वशांतीची गरज आहे. मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश
देण्याबरोबर कुरआनच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे पवित्र कुराण जीवन जगण्यासाठी असून पवित्र ग्रंथ कुराण
हे फक्त मुसलमानांसाठी नव्हे तर संपूर्ण
मानवजातीसाठी आहे इस्लाम धर्म हे भाईचारा व शांतीचा संदेश देणारे असून इस्लाम धर्माच्याअनुयायांनी
शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर
यांनी सांगितल्या प्रमाणे आपले आचरणात आणून त्याचे पालन करावे
असे आव्हान निलंगा येथे आयोजित
इज्तेमात दुसऱ्या दिवशी जोहर, असर
व मगरीबच्या नमाज नंतरच्या बयाण
प्रवचनामध्ये करण्यात आले. मंगळवारी दुपारच्या वेळेपर्यंत अधिक जिल्यातील समाज बांधवांनी उपस्थिती लावली.निलंगा शहरापासून
इज्तेमास्थळापर्यंत जागोजागी स्वयंसेवक उभे आहेत. प्रत्येक वाहनधारकांना मार्ग दाखविण्याचे काम करीत सावकाश जाण्याचा सल्ला देणारे तरुण प्रेम आणि आपुलकी दाखवित होते. इज्तेमास्थळी दोन ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. शिवाय, उपस्थित बांधवांना अत्यंत माफक
दरात दर्जेदार जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. शिवाय, इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी निलंगा शहरातील बसस्थानक, उदगीर मोडपासून मोफत सोय करण्यात आली होती .सोमवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक, धर्मगुरू कुरआन, हदीसवर बयाण (प्रवचन) करीत होते.
यावेळी या इज्तेमात हजारो मुस्लिम बांधव व
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या