औशात मोकाट कुत्र्यांनी घेतला लहान मुलीला चावा - मुख्याधिकारी यांना महिला घेराव घालणार...

 औशात मोकाट कुत्र्यांनी घेतला लहान मुलीला चावा


मुख्याधिकारी यांना महिला घेराव घालणार.



------------------------------------------

शहरात मोकाट कुत्र्यांची  दहशत...

--------------------------------------

औसा  - दिनांक ७ डिसेंबर २०२४

शनिवार  रोजी एका  लहान बालकाला मोकाट कुत्र्याने गळ्याला चावा घेतला असून नगर परिषद प्रशासन डोळे झाकून बघत बसलेत की काय ? अशी शंका नागरिकां निर्माण होताना दिसत आहे कारण की औसा शहरामध्ये पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा वावर हा मोठा प्रमाणात वाढला असून शहरात गल्लोगल्ली या कुत्र्यांचे झुडचे झुंड पाहिला मिळत आहेत.

विशेष बाब म्हणजे विविध सामाजिक संघटना,पक्ष पदाधिकारी ,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांनी  वेळो वेळी मुख्याधिकारी यांना सुचना,माहिती, निवेदन दिले  पण मुख्याधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करुण  डोळेझाक करताहेत या वर औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार ,खासदार ओमराजे निंबाळकर,लोकप्रतिनिधी, व नगरपरिषद प्रशासक यांचे दुर्लक्षकांना दिसत आहे या मोकाट कुत्र्याने आज एकालहान  बालकाला चावा घेतल्याने शहरांमध्ये लहान बालक वयोवृद्ध महिला यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जर याकडे या मोकाट कुत्र्यांचा लोकप्रतिनिधी आमदार खासदार नोबल प्रशासक योग्य बंदोबस्त करत नसेल तर महिला पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना  घेराव घालणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तौफिक कुरेशी यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या