मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणानंतर पेव्हर ब्लॉक अभावी नागरिकांची गैरसोय

 मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणानंतर पेव्हर ब्लॉक अभावी नागरिकांची गैरसोय


 औसा प्रतिनिधी 

औसा नगरपरिषदेच्या वतीने मागील अनेक दिवसापासून तिसऱ्या टप्प्याच्या मुख्य रस्त्यावरील रुंदीकरणाचे काम रखडले होते परंतु आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे आणि राज्य शासनाकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागले लातूर वेस हनुमान मंदिरापासून जामा मस्जिद पर्यंतचे रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम केल्यानंतर साईड पट्ट्याच्या ठिकाणी करावयाचे तेवर ब्लॉकचे काम मात्र अपूर्ण राहिल्यामुळे औसा शहरातील व्यापारी व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालकांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे कोट्यावधी रुपये खर्च करून तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागले परंतु तेवर ब्लॉकच्या कामास काही मुहूर्त मिळत नाही औसा नगर परिषदेने या कामी तातडीने लक्ष घालून शहरातील तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाच्या दोन्ही बाजूस साईड पट्ट्याच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण करावे तसेच रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे बुजवून हा रस्ता तातडीने सुरळीत करावा अशी मागणी व्यापारी व जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या