देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा औसा येथे जल्लोष साजरा..
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित दादा पवार यांचा शपथविधी मुंबईच्या आझाद मैदानावर संपन्न होताच औसा येथील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ऍड अरविंद कुलकर्णी, मुक्तेश्वर वागदरे, जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे कंठप्पा मुळे, पवनराज शेटे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मधुकर भोसले, माधव सिंह परिहार, मकरंद रामपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या