हभप रुक्मीनबाई हावरे यांच्या किर्तनास महिलांची अलोट गर्दी..
औसा प्रतिनिधी
औसा येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या कलशारोहण सोहळ्याच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी जालना येथील हभप रुक्मीनबाई हावरे महाराज यांच्या कीर्तनास शहरातील महिला वर्गांनी अलोट गर्दी केली होती. ग्रामोदय दैवत मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार यांना पाचारण केले असून जालना येथील ह भ प रुक्मीनबाई हावरे यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली. किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरेला थारा न देता समाजाने ईश्वर भक्ती सोबत अध्यात्माची कास धरून धार्मिक श्रद्धा जोपासली पाहिजे असे प्रबोधन महिला किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून होत असल्याने उपस्थित महिला आणि पुरुष भक्तगण यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहेत.
0 टिप्पण्या