औसा येथे किर्तन महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

 औसा येथे किर्तन महोत्सवाचे उद्घाटन संपन्न


..

 औसा प्रतिनिधी 

औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या अकराव्या कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 3  डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ह भ प दत्तात्रेय पवार गुरुजी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ शोभाताई अभिमन्यू पवार, तहसीलदार घनश्याम अडसूळ, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वागदरे ,ॲड धनंजय कोपरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महिला किर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प ह भ प शिवलीलाताई पाटील बार्शी यांनी गुंफले कार्यक्रमासाठी औसा शहर व परिसरातून हजारो महिला पुरुष भक्तगण उपस्थित होते भीमाशंकर कारंजे, प्रकाश वाघमारे, धनंजय कोपरे, उमाकांत मुरगे, श्री व सौ अविनाश पवार, जयसिंग चव्हाण, माधव सिंह परिहार, ह भ प गोविंदराव तिडके, रविशंकर राचट्टे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या