श्री मुक्तेश्वर विद्यालयात खरी कमाई उत्सवात संपन्न; 25 हजाराची उलाढाल

 श्री मुक्तेश्वर विद्यालयात खरी कमाई उत्सवात संपन्न; 25 हजाराची उलाढाल


.......

औसा (प्रतिनिधी) :- येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई महोत्सव साजरा केला आहे. यात 25 हजार रुपयाची उलाढाल झाली आहे. 


विद्यालयाचे मुख्याध्यापक शरणप्पा जलसकरे यांना स्काऊट श्रेयस माळी यांनी नवीन वर्षाचे कॅलेंडर विक्री करून शुभारंभ करण्यात आला आहे. सदरील खरी कमाई सेवा महोत्सवात विद्यालयाच्या 80 स्काऊट गाईड यांनी सहभाग नोंदविला आहे. यात खाद्य पदार्थ, कॅलेंडर यांची विक्री करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांकडून व्यवसायाला भांडवल घेत व्यवसाय कसा करावा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत शासन सर्वांना नोकरी देणे ही अशक्य बाब असल्याने बालवयात व्यवसायाचा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे बालवयात व्यवसायाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक असून व्यवसायातून आपण उत्तम कमाई करू शकतो असा विश्वास मुख्याध्यापक शरणप्पा जलसकरे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे. सदरील खरी कमाई सेवा महोत्सव स्काऊट विभाग प्रमुख दीपक क्षीरसागर, गाईड विभाग प्रमुख लता यरपलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या