निवडणुकीच्या मतपेरणीतही बळीराजाची रब्बी पेरणीची लगबग सुरू

 निवडणुकीच्या मतपेरणीतही बळीराजाची रब्बी पेरणीची लगबग सुरू 




औसा प्रतिनिधी


 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी मतपेरणीसाठी प्रचार सभा ,कॉर्नर बैठका पदयात्रा तसेच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निवडणूक जाहीरनामा आणि आपापल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार यंत्रांना राबवून मत पेरणी करीत आहेत. निवडणुकीच्या मतपेरणीत बळीराजाच्या रब्बी पेरणीची लगबग सुरू झाली आहे.यावर्षी दिवाळीपर्यंत पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी पेरणीचे शेत शिवार तयार करण्यासाठी उशीर लागला. पाऊस उघडल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करण्यासाठी पेरणीपूर्व मशागती म्हणजे वखरणी, रोटर, मोगडा मारून शेतातील गवत काडी वेचून पेरणीसाठी शिवार तयार केले. एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे शेतातील रब्बीची पेरणी आणि सोयाबीन खळे अशा कामांची धावपळ सुरू असल्याने निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचीही तारांबळ उडाली आहे. वेळेत रब्बीची पेरणी करणे शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्यामुळे निवडणुकीच्या मतपेरणीत सुद्धा शेतातील रब्बीच्या पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात औसा तालुक्यात सुरू असून हरभरा, गहू ,रब्बी ज्वारी, करडई इत्यादी रब्बी पिके करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून औसा तालुक्यात हरभरा पेरणी क्षेत्र सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या