लिंबाळा येथे मनसेची बैठक संपन्न..
औसा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने औसा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार शिवकुमार नागराळे यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी लिंबाला दाऊ,गुबाळ व मंगरूळ येथे कॉर्नर बैठका आयोजित केल्या होत्या.बैठकीस तिन्ही गावातील मतदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मंगरूळ येथील मेढे मच्छिंद्र,अतुल पाटील,भगवान रामपुरे,श्रीवर्धन कुलकर्णी, आकाश बिराजदार,रोहन जाधव,कुमार जाधव,गणेश बिराजदार गणेश बिराजदार, किसन नायर,चेतन गंडाळे, रोहन बिराजदार,ईश्वर म्हणाले, तानाजी आडमरे,नयुम शेख आधी सह अनेक युवकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी विधानसभा संघटक महेश बनसोडे तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने तालुका उपाध्यक्ष अमोल परिहार मच्छिंद्र तोर रियाज शेख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या