भादा येथे मोफत दंतरोग तपासणी शिबीर संपन्न; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
औसा प्रतिनिधी
औसा:राष्ट्रीय संत गाडगे महाराज (डेबूजी महाराज)ग्राम स्वच्छ्ता अभियान अंतर्गत दि 02 ते 31ऑक्टोंबर 2024 निमित्त शिबिराचे आयोजन निश्चीत होते परंतु विधान सभेची आचार संहिता लागू करण्यात आल्याने ते शिबीर दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी भादा येथे दंत चिकित्सक डॉ. अजित साखरे यांच्याकडून भादा गावातील नागरिकांचे दंत आरोग्य व्यवस्थित राहावे यामुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ होईल याकरिता मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले..
भादा गावतील जवळपास 75 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकिय अधिकारी डॉ महेश पवार,डॉ चव्हाण मॅडम यांनीही सहकार्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने दाताच्या आजारा बाबत मोफत तपासणी करण्यात आली व औषधाचे वितरण करण्यात आले. या शिबीराचे आयोजन करण्यासाठी सरपंच मिनाबाई दरेकर,उपसरपंच बी एम शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी माणिक सूर्यवंशी, ग्रा.पं. कर्मचारी, ग्रा.रो, सहाय्यक बालाजी उबाळे, ग्राम पंचायत सदस्य योगेश लटूरे आणि अनेक गावकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या