्किल्लारी च्या विकासासाठी शंभर कोटींचा आराखडा मंजूर करून देणार - आ अभिमन्यू पवार
किल्लारी च्या विकासासाठी विशेष पॅकेजची तरतूद करणार - आ अभिमन्यू पवार
किल्लारी च्या पायाभूत सुविधेसाठी भरीव निधीची तरतूद करणार - आ अभिमन्यू पवार
औसा - किल्लारी भूकंपग्रस्तांचे प्रश्न गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित होते ते सोडविण्यासाठी शासकीय स्तरावर बैठका घेऊन पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावण्यात आले. तर येणार्या काळात किल्लारी नगरपंचायत करून त्या खात्याच्या माध्यमातून किल्लारीच्या विकासासाठी शंभर कोटींचा आराखडा तयार करूण तो मंजूर करून घेण्याचा आपला मानस असून त्या माध्यमातून प्रतिवर्षी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीतून किल्लारी येथील अंतर्गत रस्ते, नूतन बसस्थानक यासह मुलभूत सुविधेतून किल्लारी एक विकसित गाव करणार असल्याचे अभिवचन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहे.
किल्लारी येथील विविध भागात मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की किल्लारी येथे ६५ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते असून या रस्ते विकासासाठी आपण काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि त्या निधीतून जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते पुर्ण होत आहेत मात्र येथील विकासासाठी दहा - पंधरा लाख रुपयांचा निधी पुरेसा नसून किमान शंभर ते सव्वाशे कोटींचा निधी आवश्यक आहे. यासाठी आपण ग्रामपंचायतीला एक आराखडा तयार करण्यास सांगितला असून येणाऱ्या काळात शंभर कोटींपेक्षा अधिक निधी किल्लारी च्या विकासासाठी मंजूर करण्यात येईल या अगोदर किल्लारी येथील भूकंपग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावत असताना ३२ कोटी रुपयांची तरतूद करून बंद असलेली किल्लारी ३० खेडी पाणीपुरवठा योजना सूरू करण्यासाठी निधी देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. किल्लारी येथे आयुष रूग्णालय मंजूर करण्यात आले असून. किल्लारी अपर तहसील कार्यालयही मंजुर करण्यात आले असून किल्लारी तालुका निर्मिती अगोदर याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असून किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यालाही निधी मंजूरीसाठी मदत केली जाणार असल्याचे यावेळी बोलताना आ अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
यावेळी गुंडाप्पा बिराजदार,डॉ अशोक पोतदार, बळीराम बालकुंदे, जयपाल भोसले, सिध्देश्वर बालकुंदे, गौरीशंकर बालकुंदे, अतुल हेळंबे, रमेश हेळंबे, गोविंद भोसले, राज बजाज, सुरज बाबळसुरे, राहूल भोसले, युवराज गायकवाड, शौकत शेख, युवराज बिराजदार, ईश्वर बिराजदार, संदीप शिवणीचारी, योगेश भोसले, शाम बिराजदार, सुरज भोसले, विक्रम सोनटक्के, रवीराज भोसले, दयानंद रड्डे, ईश्वर घोटाळे, ईश्वर दंडगुले, महेश पाटील, नितीन बंडगर आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
........... ..
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश
बालकुंदे परिवारातर्फे आयोजित दिवाळी स्नेह मिलन आयोजित कार्यक्रमात यावेळी सतीश गावकरी मित्र मंडळातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले...
0 टिप्पण्या