*दिनकरराव माने साहेबांचे धक्क्यावर धक्का,*
*विद्यमान आमदारांना पराभव पक्का...*
*गावा गावातील मतदार राजांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने विरोधकांना निकाला आधीच पराभवाचे स्पष्ट दर्शन*
औसा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार दिनकरराव माने साहेबांच्या अचूक व आधुनिक रणनितीच्या माध्यामाद्वारे आजपर्यंत करत आलेला प्रचार , राबवत असलेली प्रचार यंत्रणा व सुक्ष्म नियोजनाद्वारे जवळ जवळ विजय पक्का झाल्याचे वास्तववादी चित्रण संबंध तालुका भर दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचा पराभव जवळपास पक्का झाल्याचे व औपचारिकता फक्त निकाल घोषित करण्याची बाकी राहिलेली आहे , अश्या चर्चा गावा गावातील चौकात रंगत असलेल्यांचे चित्रण स्पष्ट दिसून येत आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत केलेले कार्य , दिलेले भरीव योगदान , मतदार राजाचा गावपातळीवरील मोठा जनसंपर्क, जपलेली विश्वासार्हता व दिवसें दिवस वाढत चाललेला पाठिंबा यामुळे विजयश्री तर निश्चितच पण मताधिक्य किती..? या गोष्टींना अक्षरशः ऊत आलेला आहे.
निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केलेल्या एका साध्या आवाहनाला प्रतिसाद रूपाने लाभलेला अलोट जनसागर पाहता विरोधकांना पहिला धक्का देण्याचे काम दिनकरराव माने समर्थक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी यशस्वीपणे व निर्विघ्नपणे पार पाडले. पहिल्या धक्काच्या जोर ओसरत नाही तोपर्यंत श्रीमान नितीन बानगुडे पाटील यांच्या खणखणीत विचारांची दणदणीत सभा लावून , मतदार राजा खंबीरपणे पाठीशी उभे असलेले चित्रण विराट जन समुदाया द्वारे उभे करण्यात पुन्हा यशस्वी ठरले.
दोन्ही धक्क्यांचा जोर ओसरत नाही व सहनही होत नाही तोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख - ( उबाठा गट ) श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मौजे कासार शिरसी ( ता.निलंगा ) येथे तिसऱ्या सभेचे विराज आयोजन , हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला मतदार राजा पाहता दस्तखुद्द पक्ष प्रमुखांनी दिनकरराव माने साहेबांना विजयी घोषित केले. सभेला लाभलेली अलोट गर्दी , सर्वसामान्य मतदार राजांचा उदंड प्रतिसाद व उत्स्फूर्त भावना पाहून विद्यमान आमदार व त्यांचे कार्यकर्ते चांगलेच हतबल झाल्याचे स्पष्ट चित्रण मतदार राजा बोलून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
एकंदरीत गाव पातळीवरील घरोघरी राबवलेली व सातत्याने चालू असलेली महिला व पुरूष यांची प्रचार यंत्रणा , दस्तखुद्द उमेदवार दिनकरराव माने साहेब यांच्या दररोज होत असलेल्या सभा , बैठका व मागील कार्य काळांमध्ये यशस्वी , पारदर्शक व सर्वसमावेशक केलेला कार्यकाळ यांच्या जोरा वरती खुद्द मतदार राजा स्वतः उमेदवार असल्याचे स्पष्ट वास्तववादी चित्रण पाहता माने साहेबांचे पारडे अधिकच जड दिसून येत आहे. सोबतच धक्का तंत्राचा होत असलेला अवलंब यामुळे विरोधी गटांमध्ये उडवलेली खळबळ व भांबावलेली स्थिती पाहता जवळपास दिनकरराव माने साहेबांचा विजय पक्का असेच बोलले जात आहे.
विशेषतः आजपर्यंत औसा तालुक्यातील मतदार राजाने दिनकरराव माने साहेबांना भरभरून मतांची आघाडी दिलेली असताना आज रोजी निलंगा तालुक्यातील गावामधून लाभत असलेला भरभरून प्रतिसाद व वाढत चाललेले मताधिक्य यामुळे निकालाचे वास्तववादी चित्रण नक्कीच वेगळे पाहण्याचे भाग्य औसेकरांना लाभणार आहे. कदाचित दररोज मिळत असलेला वाढता प्रतिसाद , लाभत चाललेले मताधिक्य व जाणवत असलेल्या पराभवाचे दर्शन यामुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
सोबतच विद्यमान आमदार यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये मतदार संघा मधील मतदार राज्यांच्या अडी अडचणी ओळखून प्रामाणिकपणे काम केले असते तर ही वेळ आज आली नसती हे ही बोलले जात आहे.
आचारसंहिता लागू होण्यासाठी आणखीन जवळपास चार दिवसांचा अवधी बाकी असून , येत्या कांहीं दिवसांमध्ये कोणते नवीन धक्का तंत्राचा वापर केला जाईल याचीही चर्चा हळूवारपणे कुजबुजली जात आहे. एकंदरीत या सर्व गोष्टींचा आढावा पाहता दिनकरराव माने साहेबांचे धक्क्यावर धक्के देणे चालूच असून , विद्यमान आमदारांचा पराभव मात्र पक्का केला जात आहे.
0 टिप्पण्या