आता चुक केली तर तुम्हाला काळही माफ करनार नाही.... बसवराज पाटील

 आता चुक केली तर तुम्हाला काळही माफ करनार नाही.... बसवराज पाटील 


औसा एम बी मणियार 

औसा ः चांगल्या कामाला चांगले म्हणायची दानत उजनी गावातील लोकांमध्ये असल्याने त्यांनी गेल्या पंधरा विस वर्षापासुन लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचे मुल्यमापन करणे गरजेचे आहे. माझ्या कार्यकाळात सुरु केलेला विकास आमदार अभिमन्यू पवारांनी आणखीन नेटाने सुरु ठेवला असुन त्यांनी या भागाचा कायापालट करतांना बेरोजगारांना कामाच्या संधी उपलब्ध करुन देत बेलकुंड येथे आडीशे हेक्टरवर येनाऱ्या एमआयडीसीमुळे येथे मोठ मोठे उद्योग येनार आहेत. यामुळे रोजगाराला चालना मिळणार असुन कामाच्या माणसाला निवडण्यात जर तुम्ही चुक केली तर तुम्हाला काळही माफ करणार नसल्याचे माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी म्हटले आहे. रविवारी (दि.१०) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. 



यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, कोळी महासंघाचे अध्यक्ष चैतन्य पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, अॅड. श्रीकांत सुर्यंवशी, काकासाहेब मोरे, सेनेच्या महीला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, अर्जना बिराजदार, प्रविण कोपरकर, हणमंत राचट्टे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, अरुण मुकडे, डॉ सुभाष ढवण, डॉ बाळासाहेब गंगणे, दिलीप कागे, मजहर पठाण, गिरीराज सोमाणी, काशीनाथ सगट, अण्णाराव सुर्यवंशी, बळीदादा वळके,अण्णाराव सगट आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना बसवराज पाटील म्हणाले की, आम्ही विचार आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र आलो आहोत. औसा तालुका प्रचंड मागास होता. या तालुक्यात मी आमदार होण्याच्या आगोदर विकासाचा प्रचंड अनुशेष होता. रस्ते, सिंचन, पाणी यावर काम करणे गरजेचे असल्याने मी त्यावर भर दिला. मी केलेल्या विकास कामांना नेटाने आमदार अभिमन्यू पवार पुढे नेत आहेत. त्यांनी रस्ते, पाणी, सिंचन, शेती, उद्योग या बाबत भरीव कामे केली आहेत. माझा ड्रीम प्रोजेक्ट असलेला लातुर-गुलबर्गा रेल्वेमार्ग पवारांनीच दिल्लीत जाऊन मार्गी लावला. मी विरोधात असतांनाही औशाच्या विकासावर त्यांनी माझ्याशी वारंवार चर्चा केली. सल्ला घेतला. यावरुन त्यांच्यामध्ये लपलेल्या खऱ्या लोकप्रतिनीधीची छबी मला दिसली. गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदारसंघासाठी केलेली कामे पाहता त्यांना आणखीन संधी देणे गरजेचे आहे. पाहूणा शेजारी सोयरा हे न पाहता काम करनारा लोकप्रतिनिधी निवडला पाहीजे. विकासाच्या मुद्दय़ावर लोकांनी पुन्हा एकदा अभिमन्यूु पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले पाहीजे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत ढवण यांनी केले. 


...

यावेळी आमदार अभिमन्यू पवारांनी विरोधी उमेदवाराला अव्हान दिले की . दहा वर्षात तुम्ही काय केले हे सांगा. पाच वर्षात मी काय केले हे सांगतो. विकासावर बोला मी कधीही आपल्या सोबत चर्चा करायला तयार आहे. विरोधी उमेदवाराकडे मुद्दे नसल्याने ते माझ्यावर शिवराळ भाषेचा वापर करीत आपली निष्क्रीयता झाकण्याचा प्रय़त्न करीत आहेत. मात्र तुम्ही जरी शिवराळ भाषा वापरत असाल तरी माझ्यावर चांगले संस्कार झाल्याने मी तुम्हाला थोरला भाऊच म्हणणार आहे असा टोला त्यांनी लगावला. यावेळी उजनी आणि पंचक्रोशीतील आनेक मतदार उपस्थित होते.

....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या