शिवराळ भाषेचा वापर हे तुमचे संस्कार.. विरोधात उभे असलेल्यांनाही भाऊ मानणे माझे संस्कार..
अभिमन्यू पवार
औसा प्रतिनिधी
औसा :- निवडणुक लढवितांना विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे. लोकांसाठी केलेली कामे आणि भविष्यात त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय व्हिजन आहे? यावर बोलले पाहिजे. मात्र असे न होता विरोधी उमेदवार माझ्यावर शिवराळ भाषेत टीका करीत आहेत. शिवराळ भाषा वापरणे हे तुमच्यावर झालेले संस्कार दर्शवितात. तुम्ही माझ्यावर कितीही शिवराळ भाषा वापरली तरी मी तुम्हाला माझा मोठा भाऊच मानतो. मी केलेल्या कामाला घेऊन लोकांपुढे जात मते मागत आहे. जर तुम्ही तुमच्या दहा वर्षांच्या काळात लोकहिताचे कामे केली असतील तर ती घेऊन लोकांसमोर जावा आणि कौल मागा. शिवराळ भाषेत टीका करणाऱ्यालाही भाऊ मानणे हे माझ्यावर झालेले संस्कार असल्याचा टोला भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवारांनी विरोधी उमेदवाराला लगावला. उजनी (ता. औसा) येथे रविवारी (दि. ) आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, कोळी महासंघाचे अध्यक्ष चैतन्य पाटील, काकासाहेब मोरे, सेनेच्या रंजना कुलकर्णी, अर्चना बिराजदार, हणमंत राचट्टे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, प्रवीण कोपरकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना आमदार श्री. पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षात मी केलेल्या कामांची लिस्ट घेऊन येतो तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये काय कामे केली ते सांगा. मतदारसंघातील प्रश्नांना घेऊन मी विधानसभेत भांडलो आहे, दिवसरात्र विकासाचा ध्यास घेऊन औसा ते मुंबई असा प्रवास केला. त्यामुळे माझे सर्वाधिक मुक्काम रेल्वेत झाले. तुमचे मुक्काम कुठे होत होते हे सांगायला लावू नका. लोकांना हे सर्व माहीत असल्याचे ते म्हणाले.
...
0 टिप्पण्या