औसा शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हस्ती/ प्लास्टीक पाईप लाईन चे होत असलेले काम त्वरीत थांबविण्याची एम आय एम ची मागणी -

 औसा शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हस्ती/ प्लास्टीक पाईप लाईन चे होत असलेले काम त्वरीत थांबविण्याची एम आय एम ची मागणी -


औसा प्रतिनिधी 

 एम.आय.एम.च्या वतीने निवेदन करण्यात येते की, नगर परिषद हद्दीत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चालु असलेल्या हस्ती/प्लास्टीक पाईप लाईन बसविण्याचे काम न करता लोखंडी बीडचे कायमस्वरुपी पाईपलाईन करण्याकरीता यापुर्वी एम.आय.एम. व विविध पक्षांच्या, संघटनेच्या व शहरातील नागरीकांच्या वतीने निवेदने व आंदोलन करण्यात आले होते. परंतु आमच्या विनंती व तक्रारीस कसलाही न्याय न देता आचारसंहीता काळात घाईगडबडीने काम चालु करण्यात आले आहे. जे की, चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही माहिती मागीतली असता माहिती न देता व कामाचे अंदाजपत्रक न लावता काम सुरु आहे.


तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी सदरचे काम तातडीने थांबवावे आम्हा सर्व औसेकरांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न मार्गी लावून काम थांबविण्यात यावे व लोखंडी पाईपलाईन करण्याकरीता योग्य ते निर्णय घ्यावे. अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या