महायुतीच्या प्रचारार्थ परीक्षेत पवार यांची औसा शहरात भव्य पदयात्रा..
औसा प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी नगर औसा येथून त्यातील मुख्य रस्त्यावरून ऍड परीक्षित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भव्य पदयात्रा काढून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन केले. ऍड परीक्षित पवार यांनी या पदयात्रेतून व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच जनसमुदायाला अभिवादन करीत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सर्वश्री धनंजय पर्सने, नितीन शिंदे, गुणाजी पवार, सागर अपुणे, माजी नगरसेवक अक्रम खान पठाण, विष्णू खुरपे, आकाश पाटील यांच्यासह युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या