नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खरोसा येथे समता दिन साजरा*

 *नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खरोसा येथे समता दिन साजरा*


औसा प्रतिनिधी 

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त  नवभारत विद्यालय, खरोसा ता औसा येथे आज समता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्षस प्रा. दत्तात्रय सुरवसे यांनी म. फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन   केले. सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही  अभिवादन केले.


प्रा. सुरवसे यांनी म. ज्योतिबा फुले यांच्या पणजोबांच्या कारकिर्दीपासून म. फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 रोजी झाला, त्यांचे चौथी पर्यंत शिक्षण झाले नंतर खंड पडला पुन्हा शिक्षण सुरू केले. 1840 मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. 1847 मध्ये अहमदनगर मधील दोन इंग्रजी शाळा त्यांनी पाहिल्या. 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे येथील बुधवार पेठ मधील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली, अशा प्रकारे पुणे परिसरात म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी 18 शाळा सुरू केल्या, सनातनी लोकांनी विरोध केला, वडील गोविंदराव फुले  यांनी त्यांना घराबाहेर काढले. तरीही ते शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांनी चालूच ठेवले. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, दीनबंधू हे मुखपत्रही सुरू केले. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर 6  ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण केले पाहिजे अशी साक्ष त्यांनी दिली. विधवांच्या केशवपन विरोधात न्हावी यांचा संप पुकारला. विधवा पुनर्विवाह घडवून आणला. आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधकगृह सुरू केले. दुष्काळ पडला तेव्हा दलितांना आपल्या घरातील आड पाणी भरण्यासाठी खुला केला. यशवंत यास दत्तक घेऊन त्यास शिकवून डॉक्टर केले. प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. अशा अनेक बाबी सांगून म. फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरसिंग सूर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचालन संदिपान नवखंडे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा तुकाराम कोळपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या