आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा शहरातील झंजावाती कॉर्नर सभेस वाढता पाठिंबा..
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांना औसा शहरातील झंझावाती प्रचार दौऱ्यामध्ये मतदार बंधू-भगिनी कडून वाढता पाठिंबा मिळत आहे. रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी कोपरे कॉलनी परिसरात आयोजित कॉर्नर सभेच्या माध्यमातून सकाळी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कोपरे कॉलनी, ओंकार नगर, कावेरी नगर आणि महाराणा प्रताप नगर परिसरातील शेकडो महिला तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळू सोनवळकर, विजयकुमार मिटकरी, संजय भालकीकर, सुनील उटगे यांच्या निवासस्थानासह अर्बिट स्कूल आणि खडकपुरा मोहल्ला येथील आयोजित प्रचार सभेमध्ये महायुतीचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाच्या निधीतून अनेक कामे मार्गी लावता आली असे सांगून शहरातील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम आव साठी पॉईंट ते बाजार रोड पर्यंत रस्ता व नाली बांधकाम कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सिमेंट रस्ते शहरातील क्रीडा संकुल सुसज्ज बस स्थानक शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठानचे बुद्ध विहार अल्पसंख्यांक बहुलक्षेत्रासाठी विशेष वाढीव निधी शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी तिन्ही तलावाचे सुशोभीकरण आणि शहराच्या विस्तारित भागासाठी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी 45 कोटी रुपयांची तरतूद केली आणि 11 ठिकाणी सुसज्ज सार्वजनिक शौचालयाचे निर्मिती यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून येणाऱ्या काळात शहराच्या सुरक्षिततेसाठी आपण अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहोत असे हे स्पष्ट केले यावेळी माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे यांनीही आमदार अभिमन्यू पवार यांनी शहर विकासासाठी सढळ हाताने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या काळात झपाट्याने विकास करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांना खंबीर साथ द्यावी असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर हनुमंत थोरात, सुरेश स्वामी, लक्ष्मण मुगळे, माजी नगरसेविका प्रमिला कांबळे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री घोडके, युवा मोर्चाचे नागेश साळुंखे, बाबासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रारंभी राम कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज गोमदे यांनी केले.
0 टिप्पण्या