उद्धव साहेबांच्या दणदणीत विचाराने महाविकास आघाडीचे नाणे खणखणीत.

 *उद्धव साहेबांच्या दणदणीत विचाराने महाविकास आघाडीचे नाणे खणखणीत.


औसा प्रतिनिधी 

 औसा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जाहीर सभा अलोट गर्दीने संपन्न झाली. उबाठा गटाचे पक्षप्रमख व महाविकास आघाडीचे घटक श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी औसा व निलंगा  परिसरातील मतदार राजा हजारोंच्या  संख्येने उपस्थित राहिल्याचे पाहून , तुम्ही दिनकररावांना आजच विजयी घोषित केल्याचे  सांगून , लवकरच दिनकररावांना मुंबईला पाठवा , त्यांची पुढची काळजी मी घेतो अशी ग्वाही दस्त खुद्द पक्ष प्रमुख ठाकरे यांनी भर सभेमध्ये दिली.


सकाळी १० वाजता सभेचे नियोजन असताना तब्बल ५ तासानंतर म्हणजेच दुपारी ३ वाजता  उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तरीही उपस्थित जनता तूस भरही हल्ली नाही. मतदारांची अलोट गर्दी , उदंड प्रतिसाद पाहता विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे


तदपुर्वी विविध मान्यवर नेत्यांची खणखणीत भाषणाने सभेला चांगलीच रंगत वाढवलेली होती. श्रीमान अमित देशमुख यांनी महायुतीचे सरकार स्थापन होताच १५ डिसेंबर २०२४  पर्यंत ३ लाख रूपया पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज  माफी करणार अशी ग्वाही दिली.सोबतच , नियमीत कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर रूपये ५०००० रूपये अनुदान  देणार असल्याचे घोषित केले.




सद्य स्थिती पाहता दिनकरराव माने साहेब यांना मतदार राजाने विजयी घोषित करून फक्त औपचारिकतेने विजय घोषित करणे बाकी राहिलेले आहे व किती मताधिक्याने निवडणून येतील याचीच चर्चा गावा गावातील चौका चौकात ऐकण्यास येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या