श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2024-2025 साठीचा बॉयलर आग्निप्रदीपन सोहळा संपन्न..

 श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2024-2025 साठीचा बॉयलर आग्निप्रदीपन सोहळा संपन्न..


औसा प्रतिनिधी 

मुरूम येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2024-25 साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर आजरोजी उमरगा जनता सहकारी बँकचे चेअरमन मा.श्री. शरणजी बसवराज पाटील साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संपदा शरणजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.


विट्ठलसाई हा कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री मा.श्री. बसवराजजी पाटील साहेब यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून 6000 हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यापासुन जवळपास 04 लाख मे.टन ऊसाचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. यासाठी पुरेशी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता व गेटकेन विभागातील उपलब्ध होणाऱ्या ऊस विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने 4 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याचा गोळी पुजनाचा कार्यक्रम दि.04 नोंव्हेवर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील व कारखाना लगतच्या गेटकेन विभागातील ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.श्री.बसवराजजी पाटील साहेब यांनी यावेळेस दिली. याप्रसंगी मा.श्री.बापुरावजी पाटील साहेब, चेअरमन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., उस्मानाबाद, कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. सादीकसाहेब काझी, तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री विठ्ठलराव पाटील, शरणाप्पा पत्रिके, केशवराव पवार, माणिकराव राठोड, विट्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, राजीव हेबळे, दत्त्तू भालेराव, शिवलींग माळी, अॅड. संजय बिराजदार, अॅड. विरसंगप्पा आळंगे, शब्बीर जमादार, माजी नगरध्यक्ष रशिद शेख, माजी उप सभापती गोंविद पाटील, बुध्दीवंत साखरे, सचिन पाटील, प्रा.दिलीप गरूड, अनिल ऊर्फ पप्पु सगर, देवंद्र कंटेकुरे, दत्ता चटगे, योगेश राठोड, भालचंद्र लोंखडे. रफिक तांबोळी, महेश माशाळकर, महालिंग बाबशेटटी, प्रल्हाद काळे, संजय बिराजदार, मनोहर सास्तुरे, अभिषेक गुज्जर, तसेच कार्यकारी संचालक श्री.एम.बी.अथणी व कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या