भादेकर भूमिपुत्र सूरज उबाळे यास
बार अँट लॉ मुंबई विद्यापीठची पदवी प्राप्त..
औसा प्रतिनिधी
औसा :तालुक्यातील भादा येथील रहिवासी रामराव विठ्ठल उबाळे हे पोट भरणे कामी मुंबई येथे वास्तव्यास राहून त्यांनी जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही आपल्या दोन मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण दिले.
यामुळे त्यांचे द्वितीय चिरंजीव सुरज रामराव उबाळे याने विधीक्षेत्रातील पदवी प्राप्त केल्याने नुकतेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मुंबई विद्यापीठाची पदवी नुकतीच मुंबई येथे प्राप्त झाली आहे.
यामुळे भादेकर भूमिपुत्र ची कायद्याच्या क्षेत्रात एन्ट्री झाल्याने त्यांच्यावर मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन वर्षाव केला जात आहे..आणि भविष्यामध्ये नामवंत कायदे तज्ञ व्हावे गरजू व्यक्ती व आर्थिक दृष्ट्या कमजोर कमकुवत नागरिकांना पदवीचा लाभ व्हावा आणि जनसेवेवर लक्ष द्यावे अशाही शुभेच्छा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर दिल्या जात आहेत.
0 टिप्पण्या