४३ कोटी रुपयांच्या औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन...
औसा शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा हाच आपला संकल्प - आ अभिमन्यू पवार
औसा - औशाच्या इतिहासात आतापर्यंत उन्हाळ्यात टॅकरव्दारे पाणीपुरवठा व्हायचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ५० कोटीतून औसा शहर पाणीपुरवठा योजना पुर्ण झाली आणि औसेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला यासह वाढीव शहराला पाणीपुरवठा व्हावा या दुष्टीने औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ४३ कोटींचा निधी मंजूर करून घेत आज या योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आॅनलाईन झाले असून औसा शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा हाच आपला संकल्प असल्याचे सुतोवाच आ अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले आहे. (दि.२) आॅक्टोबर रोजी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाअंतर्गत ४३ कोटी रुपये निधीतून औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.याप्रसंगी आ पवार बोलत होते.
यावेळी औसा नगरपालिकेच्या समोर सदरील योजनेच्या कामाच्या फलकाचे आनावरण आ अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, शहराध्यक्ष सुनील उटगे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, अक्रम खान, अरविंद कुलकर्णी, संतोष चिकुर्डेकर, शिव मुरगे, गोपाळ धानुरे, कल्पना डांगे, प्रदीप मोरे आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की औशाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या इतिहासात जेवढा निधी उपलब्ध झाला नाही त्यापेक्षाही अधिकचा निधी या पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी मंजूर करून आणला शहरातील प्रत्येक भागात समांतर विकास साधत असताना शहरात १४ ठिकाणी अद्यावत शौचालये उभा करण्याचे काम पुर्ण होत असून क वर्गाच्या या नगरपालिकेच्या विकासासाठी येणाऱ्या आठ दिवसात आणखी मोठा निधी उपलब्ध केला जाणार असून या निधीतून शहराचा कायापालट होणार आहे. औसा शहरात उभारलेल्या नूतन बसस्थानकाचे लोकार्पणही लवकरच केले जाणार असून या बसस्थानकातून शहरी तर जुन्या बसस्थानकातून ग्रामीण भागात वाहतूक होईल.बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औसा शहराच्या तिसऱ्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून याही कामाचे लोकार्पण लवकरच केले जाईल असे सांगून शहरातील ज्या ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्ये सुधारणात्मक कामे करण्यात येणार आहेत. औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा, मुख्य रस्ता तिसरा टप्पा, वरिष्ठ स्तरीय दिवाणी न्यायालय, भव्य बसस्थानक आणि अंतर्गत रस्त्यांची शेकडो कोटींची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर शेकडो कोटींची कामे प्रत्यक्षात सुरु आहेत. महानगरपालिकेचा दर्जा असलेल्या शहरांमधील नागरिकांनाही मिळणार नाहीत अशा नागरी सुविधा औसा शहरातील नागरिकांना मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
..........
सीसीटिव्ही साठी ३ कोटींचा निधी..
औसा शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात ३ कोटी रुपयाच्या निधी उपलब्ध करून हाय रेग्युलेशन चे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून शहरातील २५ मुख्य व उपमुख्य रस्त्यावर हे कॅमेरे लावण्यात येतील याचबरोबर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून स्वच्छ व सुरक्षित औसा हा संकल्प आ अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखविला.
...................
शहरात उभारण स्टॅच्यू पार्क
औसा शहरात एक स्टॅच्यू पार्क उभारले जाणार आहे त्यामध्ये पाच महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत या स्टॅच्यू पार्क साठी जागेचा शोध सुरू आहे. जेणेकरून एकाच ठिकाणी महापुरुषांचे पुतळे प्रेरणादायी पुतळे उभारले जातील
...............
व्यापारी संकुलाच्या ठेवीच्या व्याजातून स्वच्छता कामगारांना नियमित वेतन..
औसा शहरात १० कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारले जाणार आहे यासाठी निधीही उपलब्ध झाला असून या व्यापारी संकुलाच्या जाहीर लिलावाच्या ठेवी रक्कम बँकेत जमा करून मिळणाऱ्या व्याजातून नगरपालिका सफाई कामगारांना महिन्याच्या महिन्याला वेतन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील असे आ अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या