आ अभिमन्यू पवार यांच्या फंडातून..
जिल्हा परिषदेच्या २२४ शाळेतील मुख्याध्यापकांना ३१ लाख रुपयांचे टॅब वाटप
औसा प्रतिनिधी
औसा - औसा विधानसभा मतदारसंघातील औसा तालुक्यातील १५१ आणि निलंगा तालुक्यातील ७३ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या आमदार निधीतून ३१ लाख रुपयांचे टॅब (दि.१२) आॅक्टोबर रोजी लामजना (ता.औसा) येथील कार्यक्रमात आ अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा घुगे - ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना प्रधानमंत्री शिक्षण पोषक शक्ती निर्माण, संच मान्यता, विद्यार्थी पोर्टल, युडायएस पोर्टल, शाळा पोर्टल, इयत्ता पाचवी / आठवी शिष्यवृत्ती पोर्टल, शाळा सिध्दी, शालांत पगार, विद्यार्थी हजेरी व इतर कामे मोबाईलव्दारे करता येत नव्हती त्यामुळे औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेतील सर्वच काम ऑनलाईन करावे लागत असून खाजगी यंत्रणेकडून करून घ्यावे लागत आहे . यामुळे तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना एक टॅब द्यावी अशी मागणी औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी केली. त्या मागणीनुसार आमदार निधीतून तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना एक टॅब देणार असे औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आयोजित ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले.त्यानूसार लामजना येथील कार्यक्रमात ३१ लाख रुपयांच्या आमदार निधीतून २२४ शाळेतील मुख्याध्यापकांना टॅब चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार अभिमन्यू म्हणाले की लहान मुलांना घडविणे हे सर्व कामापेक्षा मोठे काम आहे. आणि ते फक्त शिक्षकच करु शकतात जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांचे मुले शिकतात त्यामुळे तिथे कोणीतीही शैक्षणिक सुविधा पाहिजे असेल तर मी ती उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तयार आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे शाळेला सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे अद्य कर्तव्य असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा घुगे - ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे सचिव सुहास पाचपुते, क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या