प्रणव सिंह राजू पाटील यांना अग्रोनोमी विषयात पीएचडी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील संपादक राजू शंकरराव पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रणव सिंह राजू पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने ऍग्रो नॉमी विषयांमध्ये पीएचडी मिळाली आहे. अत्यंत दर्जेदार उसाची वाढ आणि उत्पादनातील वाढीसाठी सिंचन पद्धती व पोटॅशियम सोर्सेस हा प्रबंध त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सादर केला होता. मराठवाडा कृषी विद्यापीठ पुणे येथून बीएससी एग्रीकल्चर आणि कर्नाटक राज्यातील धारवाड येथून एम एस सी अग्रिकल्चर हे पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी बारामती येथील कृषी महाविद्यालयामध्ये अभ्यासू व नामांकित प्राध्यापक म्हणून कार्य करीत हा प्रबंध सादर केला होता प्रणव सिंह पाटील यांना ऍग्रो नॉम विषयामध्ये पीएचडी संपादन करण्यासाठी डॉक्टर अंगद सोळंके कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सहाय्यक मार्गदर्शक म्हणून डॉक्टर उल्हास सुर्वे आणि डॉक्टर विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रणव सिंह राजू पाटील यांना ॲग्रोवन आम्ही विषयांमध्ये पीएचडी मिळाल्याबद्दल मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिपणप्पा राजट्टे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रविशंकर राचट्टे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे, मुक्तेश्वर देवालय न्यास चे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे, मुक्तेश्वर मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक धनंजय कोपरे, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या