*संरक्षण व उर्जा खात्याच्या सल्लागार*
*समितीवर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची निवड*
*महाराष्ट्रातून दोन खासदारांना संधी डॉ शिवाजीराव काळगे यांचा समावेश*
लातूर, दि. २७.
केंद्रात महत्वाच्या असलेल्या संरक्षण खात्याच्या सल्लागार समितीवर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची निवड झाली असून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत महाराष्ट्रातून दोन लोकसभा खासदारांना संधी देण्यात आली आहे. त्यात लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समितीत समावेेश करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय संसदीय मंत्रालयाने २१ ऑक्टोबर रोजी याबाबतची अधिसूचना काढली आहे. तसेच खासदार डॉ काळगे यांची मागील महिन्यातच केंद्रीय ऊर्जा विभागाच्या संसदीय समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. संरक्षण विभागाच्या या सल्लागार समितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे अध्यक्ष आहेत. समितीत लोकसभेतील १४, राज्यसभेतील सहा तर दोन पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. संरक्षण विभागाच्या योजना, धोरण, कार्यक्रम व अन्य विषयावर चर्चा करून सल्ला देण्याचे हि समिती करते देशाच्या संरक्षण विषयक बाबीसाठी सल्ला देण्याची संधी यानिमित्ताने सदस्यांना मिळते. संरक्षणविषयक ध्येय धोरणे व निर्णयांपूर्वी समितीचा सल्ला संरक्षण विभागाकडून विचारात घेतला जातो. खासदार डॉ. काळगे यांना या समितीत स्थान देण्यात आल्याने लातूरची मान उंचावली आहे.
*विश्वासाला साजेल असे काम करू*
काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, विरोधी पक्षनेते राहूलजी गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेजी यांच्या सुचनेनुसार संरक्षण विभागाच्या सल्लागार समितीवर माझी निवड झाली असून समिती सदस्याच्या जबाबदारीतून नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसे काम करून दाखवणार असल्याचा विश्वास डॉ. शिवाजीराव काळगे यांनी येथे बोलताना व्यक्त केला. तसेच पक्षाच्या कोट्यातून समितीवर संधी दिल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे व नेत्यांचे आभार मानले आहेत.
------
*खासदार डॉ काळगे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन*
लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव गाडगे यांची देशाच्या संरक्षण व ऊर्जा खात्याच्या समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांचे राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमदार देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
0 टिप्पण्या