होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
औसा प्रतिनिधी
शार्दीय नवरात्र महोत्सव निमित्त महा विकास आघाडीच्या वतीने औसा विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या कलागुणाला वाव मिळावा आणि दैनंदिन कामकाजातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या उपक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन व महिलांच्या कलागुणाला वाव मिळण्यासाठी स्नेह श्री फाउंडेशन आणि औसा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित समारोप कार्यक्रमास सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी येथील श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सौ मंगलबाई खानापुरे या होत्या याप्रसंगी सौ स्नेहा उटगे, ऍड मंजुषा हजारे, सौ. सईताई गोरे, सौ. प्रियांका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तसेच माजी आमदार दिनकरराव माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे ,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमर खानापुरे, राष्ट्रवादीचे रशीद शेख, जगदीश स्वामी, श्याम सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नवरात्र महोत्सवानिमित्त या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये औसा विधानसभा मतदारसंघात सलग 9 दिवस ठीक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये औसा शहर व तालुक्यातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तरीत्या सहभाग घेऊन कार्यक्रमास रंगत आणली.
0 टिप्पण्या