संपूर्ण औसा व नाथ संस्थान आपल्या पाठीशी ताकदीने उभा - हभप गुरुबाबा महाराज औसेकर
आपणास नाथ पिठाचा आशिर्वाद - हभप गहिनीनाथ महाराज औसेकर.
नाथ संस्थानच्या वतीने आ अभिमन्यू पवार यांचा गौरव..
औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या सकारात्मक विचाराने औसा मतदारसंघात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रात चांगले विकास कामे झाले असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे नाथ संस्थानच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. चांगल्या संस्कारांमुळे त्यांच्या हातून चांगले कामे होत असून औसा व नाथ संस्थान त्यांच्या पाठीशी पुर्ण ताकदीने असून त्यांना पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची गरज मिळेल असा आशावाद नाथ संस्थानचे हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांनी व्यक्त केला आहे.
औसा येथे नाथ संस्थानच्या वतीने (दि.२६) रोजी नाथ भक्तांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांचा गौरव नाथ संस्थानच्या वतीने करण्यात आला. यावेळी नाथ संस्थानचे हभप गुरुबाबा महाराज औसेकर, पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, हभप गोरखनाथ महाराज औसेकर, हभप दत्तात्रय पवार गुरुजी, सौ पार्वती दत्तात्रय पवार, सौ शोभाताई अभिमन्यू पवार, क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड परिक्षीत पवार आदीसह नाथ संस्थानचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नाथ संस्थानच्या वतीने आ अभिमन्यू पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ विकास योजनेंतर्गत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर गोपाळपूर विकासासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल नाथ संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हभप गुरुबाबा महाराज औसेकर बोलत होते की. कामाच्या माध्यमातून आ अभिमन्यू पवार यांचे समाजासाठी, तालुक्यातील लोकांसाठी, गोरगरिबांसाठी व महाराष्ट्र घडविण्यासाठी काम सुरू आहे. त्यांच्या या कामाबद्दल मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी गोपाळपूर विकासासाठी येणाऱ्या काळात आणखी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे सांगून औसा शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, तिसरा टप्पा, नूतन बसस्थानक आदी कामामुळे शहराच्या विकासात भर पडल्याचे त्यांनी सांगितले.
..................
आपणास नाथ पिठाचा आशिर्वाद - हभप गहिनीनाथ महाराज औसेकर.
औसा - एक लाखात एक काम होवू शकते पण एका आशिर्वादाने एक लाख कामे होवू शकतात यामुळे या नाथ पिठाचा आशिर्वाद आ अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गोपाळपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी आवाज उठवणारे आमदार अभिमन्यू पवार हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे तेथील विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. विकासाच्या दृष्टीसोबत संस्कार, सामाजिक दुष्टी असणे आवश्यक आहे आणि यासोबत जर आध्यात्मिक दुष्टी असेल तर तो व्यक्ती निष्कलंक असू शकतो असे म्हणाल तर वावगे ठरणार नसल्याचे सांगून आ अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या आचरणातून समाजाचा आदर मिळवला आहे. त्यांनी केलेल्या गोपाळपूर च्या सेवेमुळे प्रत्येक भक्त आनंदी असल्याचे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
.
0 टिप्पण्या