प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आमदार अभिमन्यू पवारांनी भरला उमेदवारी अर्ज..





 प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आमदार अभिमन्यू पवारांनी भरला उमेदवारी अर्ज.. 



न भूतो न भविष्यते अशा शंखनाद रॅलीतून आ अभिमन्यू पवार यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन


.औसा प्रतिनिधी....

औसा - भाजपाचे आमदार अभिमन्यू पवारांनी आपला उमेदवारी अर्ज विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत शंखनाद रॅलीद्वारे शुक्रवारी (ता.२५) दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्तात्रय कोळपे, रिपाईचे समाधान वाघमारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रदीप मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख बंडू कोद्रे यांच्यासह भाजपाचे आनेक पदाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


औसा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आमदार अभिमन्यू पवार हे निवडणुक लढवित आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी विराट रॅलिद्वारे दाखल करण्यात आला. शहरातील छत्रपती संभाजी नगर येथुन रॅलिला सुरुवात झाली. यावेळी मतदारसंघातील हजारो लोकांची उपस्थिती होती. ही रॅली गांधी चौक, हनुमान मंदीर, जुने बस्थानक या मार्गावरुन तहसील कार्यालया समोर आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आगोदर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आमदार म्हणुन अभिमन्यू पवारांनी सर्वबाजुंनी चांगले काम केले आहे. विकासाचे एक वेगळे पर्व मतदारसंघात सुरु झाल्याने याला खंड न देता तो पुढे सुरु राहण्यासाठी अभिमन्यू पवारांना साथ देण्याचे अवाहन त्यांनी केले.

.................. 



मी चांगली सेवा केली आता तुमची वेळ


यावेळी झालेल्या भाषणात आमदार अभिमन्यू पवारांनी सांगीतले की, मतदारसंघाच्या विकासासाठी व प्रत्येक जातीधर्मासाठी मी चांगले काम केले. मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला. औसा शहरासाठी पाचशे कोटी रुपये आणुन शहरासह मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. मी माझे काम केले आहे. आता तुमची वेळ आली आहे मला साथ देण्याची. औशाला नंबर एक बनवायचे असेल तर मला साथ द्या. असे अवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केले. त्यानंतर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जात त्यांनी निवडणुक विभागात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या