मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी आ अभिमन्यू पवार यांची खंबीरपणे साथ द्यावी..

 मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी आ अभिमन्यू पवार यांची खंबीरपणे साथ द्यावी.. 




भाजप जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता यांचे आवाहन. 





औसा -  गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले कामे आपण पाहात आहोत युवकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करून एमपीएससी मधील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.याचबरोबर शैक्षणिक चळवळीतून राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे धोरण आखून मतदारसंघातील शाळांमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत असताना तरुण उद्योजक निर्माण व्हावेत व तरुणांच्या रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने औसा तालुक्यात अडीचशे हेक्टरवर एमआयडीसी मंजूर केली आहे. एकंदरीत युवकांच्या उज्वल भविष्यासाठी कायम पाठपुरावा करणारे आमदार अभिमन्यू पवार यांना मतदारसंघातील उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी खंबीरपणे साथ द्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हा प्रभारी मुख्य यांनी केले आहे.

औसा विधानसभा मतदारसंघ भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी - रिपाई - रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा (दि.२२) आॅक्टोबर रोजी औसा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संतोषअप्पा मुक्ता बोलत होते की मतदारसंघात आपण विकासाच्या मुद्यावर जनतेला मत मागणार आहोत या पाच आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या कामाची पावती जनतेकडून मिळणे आपल्याला अपेक्षित असून जनता पुन्हा काम करण्याची संधी देणार असल्याचा विश्वास आहे. सोशल मीडिय हे प्रभावी माध्यम आपण केलेले काम जनतेला दाखविण्यासाठी असून सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. जेणेकरून आपण केलेले काम जनतेपुढे आपणाला ठेवता येणार आहे. मतदारसंघात युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्वपर्ण कामे या पंचवार्षिक काळात झाले आहेत. येणाऱ्या काळातही मतदारसंघातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल याचबरोबर राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत उर्वरित सर्वच जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जेणेकरून मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधासह क्रीडा व मैदानी खेळातील खेळाडू निर्माण होण्यासाठी होईल.


                            एकंदरीत आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात दिवसरात्र एक करून प्रचंड काम केले आहे. प्रत्येक घटकाला समान न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी काम केले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या