महात्मा गांधी विचार मंचातर्फे औसा येथे राष्ट्रपित्यांना अभिवादन...
औसा : - प्रतिनिधी
सत्य आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विचार मंच औसा यांच्या वतीने येथील गांधी चौकात आयोजित कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, सेवानिवृत्त प्रा. एम झेड आलुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार घनश्याम अडसूळ, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशआप्पा ठेसे, माजी नगरसेवक शेख शकील, मुक्तेश्वर देवालय न्यासचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे, भाजपा शहराध्यक्ष सुनील उटगे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष उमाकांत मुर्गे, विरभद्रेश्वर शाळेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे, इमामअली आळंदकर, सनाउल्ला शेख, पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, पत्रकार विजयकुमार बोरफळे, विनायक मोरे, एस ए काझी, मुक्तार मनियार, संपादक रोहित हंचाटे, उद्धव लोंढे, रावसाहेब सूर्यवंशी, राम शिंदे, डॉ. श्रीमंत क्षीरसागर, अशोक देशमाने, रामहरी माळी, मंडळाधिकारी विकास बिराजदार, तलाठी महासंघाचे अध्यक्ष भागवत सोनवते, महसूल सहाय्यक चंद्रकांत राजुरे, ॲड शिवराज राजुरे, ॲड विजयकुमार अष्टुरे, राष्ट्रवादीचे रशीद शेख, मं. युनूस चौधरी, निवृत्ती कटके, राम वैजवाडे, किरण उटगे, पाराप्पा कोकणे, अनिल पांडे, सुरेश अप्पा कल्याणी, वीरभद्र कोपरे, जयसिंग चव्हाण, बेलेश्वर कल्याणी, निलेश अपसिंगकर यांच्यासह शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कांबळे यांनी केले प्रा. एम झेड आलूरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी विचार मंच तर्फे प्रा. एम झेड अलुरे, तहसीलदार घनश्याम अडसूळ आणि मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना "माझे सत्याचे प्रयोग" हे आत्मचरित्र भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव कांबळे यांनी केले, तर सुनील उटगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या