नविन ह‌द्दवाढ भागात हस्ती/ प्लास्टिकची पाईनलाईन न करता कायमस्वरुपी सोखंडी पाईपलाईन करा

 नविन ह‌द्दवाढ भागात हस्ती/ प्लास्टिकची  पाईनलाईन न करता कायमस्वरुपी सोखंडी पाईपलाईन करा 


औसा प्रतिनिधी 

 औसा शहरातील हद्दवाढ भागात  पि.व्ही.सी. ची पाईपलाईन आहे. ती सारखी नादुरुस्त होत असते. त्यामुळे पाणी पुरवठ्यात  व्यत्यय निर्माण होते त्यामुळे अनेक वर्षापासून नागरीकांची मागणी होती की, लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी आता आम्हाला असे निदर्शनास आले आहे की लोखंडी पाईपलाईन ऐवजी हस्ती पाईप जे की, सदा तात्पुरता कामासाठी पाईलाईन वापरण्यात येणार आहे. सदरील पाईपलाईन ही हस्तीची करण्यात येऊ नये.  

लोखंडी पाईपलाईनने सर्वांना समान पाणी मिळू शकते  व योग्य दाबाने पाणी पुरवठा होतो परंतु हस्ती पाईपलाईनने पाण्याचा दाब योग्य राहत नाही  किंवा जागोजागी पाईप लाईन फुटु शकते त्यामुळे पाणीपुरवठामध्ये अंत्यत अडचणी निर्माण होऊ शकतात.हस्ती पाईप लाईन केल्यामुळे नळ धारकांना मिळणार-या पाण्याचा दाब हा कमी होऊन नळ धारकांना पाणी कमी मिळू शकते. हस्ती पाईप हे लिकीज होऊन नळ धारकांना पाणी कमी मिळू शकते. हस्ती पाईपलाईन मार्फत  नळ घेताना त्रास होऊ शकतो. व लिकेज ही होऊन धारकांना   पाणी कमी मिळू शकते. तसेच हस्ती पाईपलाईनच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो .


तरी नविन हद्द‌वाढीत व इतर ठिकाणी  हस्तीची पाईपलाईन  न करता लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी . अन्यथा  भारतीय युवक कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा  मंगळवार दिनांक 1 अॉक्टोंबर रोजी  युवक कॉग्रेस औसा तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी निवेदन देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश बिदादा, शहराध्यक्ष पवन कांबळे, कार्याध्यक्ष खाजाभाई शेख, उपाध्यक्ष अजहर पठाण, ओबीसी कार्याध्यक्ष नियामत लोहारे, सरचिटणीस शंकर लवटे, मोहसीन शेख,प्रसाद फुटाणे, सुमित माळी वाघु सरवदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या