श्री विरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांंचा स्वच्छता अभियान..
औसा प्रतिनिधी
महात्मा गांधी स्वच्छता सप्ताहा निमीत्त औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी औसा बसस्थानक परीसराची स्वच्छता केली.
महात्मा गांधीजींच्या कार्याची व स्वच्छतेची जाणीव जागृती करवून देण्यासाठी औसा बसस्थानक परीसराची स्वच्छता मोहीम बाबवण्यात आली यासमवेतच स्वच्छतेवर आधारीत स्लोगन व घोषणांनी बसमधील प्रवाशांचे लक्ष केंद्रित करून घेत होते. आगारप्रमुख शंकर स्वामी, शाळेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे,बसस्थानक प्रमुख शेख हबीब, किशोर माने, रावसाहेब वादळे, विश्वनाथ केवळराम, शिवाजी वैद्य आदीसह आगारातील व
बसस्थानकातील अधिकारी , स्वच्छता दूत विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या