औसा मतदारसंघात 38 उमेदवारांचे अर्ज दाखल.. शेवटच्या दिवशी दिनकर माने, संतोष सोमवंशी, शिवकुमार नागराळे यांचा समावेश.

 औसा मतदारसंघात 38 उमेदवारांचे अर्ज दाखल..

शेवटच्या दिवशी दिनकर माने, संतोष सोमवंशी, शिवकुमार नागराळे यांचा समावेश.



औसा प्रतिनिधी 


239 औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारसंघातून एकूण 38 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापेक्षा शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दिनकर माने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष सोमवंशी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवकुमार नागराळे यांच्यासह इतर 22 असे एकूण 25 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी घनश्याम अडसूळ यांनी दिली. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दिनकरराव माने यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल केले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी शिवसेनेतून बंडाचे विशाल फडकावत वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने आपल्या समर्थकांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी मिरवणूक काढून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी  तहसील कार्यालय औसा येथे नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या