गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोरील घाणीमुळे दुर्गंधी नागरिक त्रस्त..

 गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोरील घाणीमुळे दुर्गंधी नागरिक त्रस्त..


 औसा प्रतिनिधी 

औसा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरच मागील अनेक दिवसापासून कचऱ्याचे ढीग साचले असून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला घाणीचा विळखा आल्याने या परिसरातील कर्मचारी तसेच फेरीवाले भाजीविक्रेते त्रस्त झाले आहेत. हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस भाजी विक्रेते भाजीवाले व फेरीवाले व्यवसाय करीत असताना सडलेला भाजीपाला व इतर घाण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच टाकत आहेत. प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचे ढीग अनेक दिवसांपासून साचले असून नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे व अनेक दिवसापासून कचरा उचलला नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दररोजचे भाजीविक्रेते व ग्रामीण भागातून आलेले शेतकरी या परिसरामध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असून सडलेला भाजीपाला व येणारे जाणारे नागरिक या परिसरात लघुशंका करीत असल्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालय व महिला एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या कामी तातडीने लक्ष घालून येथील कचरा नियमित उचलावा अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या