शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेचा कॅन्डल मार्च आंदोलन..

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेचा कॅन्डल मार्च आंदोलन..


औसा प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी औसा येथे कॅन्डल मार्च काढून आंदोलन करण्यात आले.

*या आंदोलनात अतिवृष्टीने सोयाबीन,उडीद मूग व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट पिक- विमा मंजूर करावा.*

*करपा रोग व अतिवृष्टीने झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करावी.*

*हमीभावाच्या धोरणात बदल करून सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार रुपयाचा हमीभाव दर जाहीर करावा.*

*शेतकऱ्याचा इतर सर्वच प्रकारचा माल हमीभावाने खरेदी करावा.*

*सोयापेंड आणि सोयाबीन तेलाच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे दर पडत असल्यामुळे आयात- निर्यात धोरणाचा फेर आढावा घ्यावा (आयात निर्यात धोरण बदलावे).

*मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता त्या कमी करण्यासाठी संभाजीनगरचे मा.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व हंगाम निहाय १०,००० दहा हजार रुपयाची मदत करावी. या करण्यात आलेल्या शिफारशीची शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी.*

*जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील हक्काच्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप न केल्याने सदरील शेतकऱ्यांना पर जिल्ह्यातील कारखान्यास ऊस घालावा लागला परंतु सदरील कारखानदारानी शेतकऱ्यांना अद्यापही उसाची बिले अदा केलेली नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची देयके अदा करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा.* 

अशा विविध मागण्यासाठी  दिनांक १३ सप्टेंबर  शुक्रवार रोजी सायंकाळी 7  वाजता  शासकीय विश्रामगृह औसा येथून ते  हनुमान मंदिर* या मार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने *कॅन्डल मार्च काढुन आंदोलन करण्यात आले.मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नांगराळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या " कॅन्डल मार्च "  आंदोलनात शेकडो शेतकऱ्यासह मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी, तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, विधानसभा संघटक राजेंद्र कांबळे, लातूर ग्रामीण विधानसभा संघटक सतीश जंगाले, शहराध्यक्ष प्रवीण कठारे,विकास लांडगे, नवनाथ माचवे,अतिक सय्यद, अनंत भिसे, युवराज आळणे, समाधान फुटाणे, विवेक मावरकर, अमोल थोरात,तानाजी गरड, नवनाथ कुंभार, अनीस गुळवे, ज्ञानेश्वर गरड,देवानंद आळणे, संतोष कुंभार, नितीन गरड, धनराज चिखले आदि कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या