औसा पत्रकारांच्या वतीने वीरशैव गणेश मंडळाची आरती संपन्न

 औसा पत्रकारांच्या वतीने वीरशैव गणेश मंडळाची आरती संपन्न


औसा (प्रतिनिधी)दि. ९

 औसा शहरातील मानाचा वीरशैव गणेश मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबविणारा मंडळ म्हणून परिचित आहे वीरशैव गणेश मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी औसा तालुक्यातील पत्रकारांना श्री गणेशाच्या आरतीचे निमंत्रण देण्यात आले होते. सायंकाळी आठ वाजता औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील, विजयकुमार बोरफळे, रमेश दूरुगकर, संजय सगरे,राम कांबळे, विनायक मोरे, एस ए काझी, मुक्तार मणियार, विवेक मिश्रा, गिरीधर जंगाले, प्रकाश कुलकर्णी, इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.याप्रसंगी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता रमेश आप्पाला राचट्टे, राजाभाऊ नागराळे, अमर उपासे, मुरगे,वैजनाथ सिंदुरे, शिवशंकर सुतार, रुपेश कारंजे, यांच्यासह वीरशैव गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या