आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश....

 आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश.... 




तावरजा प्रकल्पावरील ४ को. प. बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतरण करण्यास मंत्रिमंडळाची

 मंजुरी, 




औसा प्रतिनिधी 


औसा - मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ७१ कोटी रुपये खर्चून तावरजा प्रकल्पावरील उंबडगा, हासाळा, कव्हा व पेठ या ४ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. सेलू येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजुरीच्या अंतिम टप्यात असून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यालाही मंजूर मिळणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे २० ते २५ गावांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे. 


             औसा तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे ३० ते ३५ वर्षापूर्वी तावरजा नदीवर को.प. बंधा-याची शृखंला बांधण्यात आली होती. सदरच्या बंधा-याचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे बांधाची फुटतुट झाल्यामुळे निडल्स खराब झाल्यामुळे, दगडी बांधकामामध्ये कामे केलेली असल्यामुळे मुख्य भिंतीतुन व पायातून पाणी पाझरणे इ. कारणामुळे पडणा-या अल्प पावसाचे पाणी न साठता वाहुन जात आहे. मागील पाच वर्षाची सिंचन व पाणीसाठा आकडेवारी सबंधीत विभागाकडुन संकलित केली तेव्हा पाणीसाठा व बंधा-यावरील सिंचन क्षेत्र निरंक असल्याची माहिती प्राप्त झाली. ही बंधारे पुर्ण झाल्यापासुन सिंचन क्षमतेचा पुर्णक्षमतेने वापर होत नाही. किंबहुना यापैकीही सर्वच बंधारे कार्यरत नाहीत या कारणामुळे ज्या उद्देशाने ही कामे केली आहेत तो सफल होत नाही.औसा तालुक्यातील भौगोलिक परिस्थीतीचा विचार करुन अस्तीत्वातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याचे बॅरेजमध्ये रुपांतरण करणे आवश्यक आहे. बॅरेजमध्ये रुपांतरण कामात यांत्रिकी पध्दतीचे दरवाजे बसवुन पाणीसाठा करणे व पुर परिस्थीतीमध्ये कमी वेळात पूर पातळीच्या वर दरवाजे घेवून पुर विसर्ग करणे याबाबी यांत्रिकी पध्दतीने अतिशय अल्प वेळात करता येत असल्यामुळे बंधा-यात १०० टक्के शाश्वत पाणीसाठा करणे शक्य आहे. या बरेजच्या रुपांतरण कामात पूर्ण साठवण क्षमतेने दीर्घ कालावधीसाठी मे ते जून महिन्यापर्यंत नदीपात्रात पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होते. या बाबींचा विचार करुन (दि.३०) रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तावरजा नदीवरील अस्तीत्वातील ५ को.प.बंधा-याचे बॅरेज मध्ये रुपांतरण कामास 


                          प्रस्तावित बॅरेजेसमध्ये (उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे) बसविण्यात येणार असल्यामुळे केंव्हाही गेट उघडून पाणी सोडता येईल आणि केंव्हाही गेट टाकून पाणी अडवता येईल. बॅरेजेस निर्मितीनंतर १२ महिने प्रकल्पात पाणी राहील ज्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी तर उपयोग होईलच पण प्रकल्पावरील गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सुद्धा १२ महिने पाणी उपलब्ध राहील. या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाणीपातळीत सुद्धा वाढ होईल.



............ 


या निर्णयाचा २० ते २५ गावांना सिंचन व पिण्याच्या पाण्याचा फायदा होणार 



लातूर जिल्ह्यातील तेरणा, मांजरा व रेणा प्रकल्पांवर यापूर्वीच बॅरेजेस बांधण्यात आलेले पण तावरजा प्रकल्पावर मात्र बॅरेजेस बांधण्यात आले नव्हते. तावरजा प्रकल्पावरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बॅरेजेस मध्ये रूपांतरित करण्यात यावेत यासाठी मी मागच्या २ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होतो.या निर्णयाचा औसा मतदारसंघातील २० ते २५ गावांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन व संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे आभार.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या