मुल्क की तरक्की और अम्न के लिये जद्दो जहद करते रहो तुम्हारा साथ अल्लाह देगा."मोहम्मद उमरैन मेहफूज सहाब रहेमानी.

 "मुल्क की तरक्की और अम्न के लिये जद्दो जहद करते रहो तुम्हारा साथ अल्लाह देगा."मोहम्मद उमरैन मेहफूज सहाब रहेमानी.





औसा प्रतिनिधी 


औसा दि.३० देशात शांतता नांदावी व तळागाळातील जनतेचा विकास व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करून ईश्वराकडे प्रार्थना केल्यास नक्कीच ईश्वर तुमच्या पाठीशी राहील असे मार्गदर्शन शहरातील हाश्मी फंक्शन हॉल मध्ये ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मौलानांनी उपस्थित नागरिकांना उपदेश केला.

यावेळी भारतातील प्रसिद्ध विद्वान डॉ. मुफासिरे कुराण हजरत मौलाना मुहम्मद उमरैन महफूज साहेब रहमानी  यांच्या सोबत खलीफा हजरत मौलाना मोहम्मद वली रहमानी साहेब सरचिटणीस ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सज्जाद नशीन खानकाह रहमानी मालेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

       ३० सप्टेंबर २०२४ रोजी हाश्मी फंक्शन हॉल येथे जलसा इस्लाहे मुआशरा आयोजित करण्यात आला होता. यात ज्येष्ठ  हजरत मौलाना मुहम्मद इजराइल साहेब रशिदी अध्यक्ष जमियत उलेमा अर्शद मदनी जिल्हा लातूर, मौलाना अमजद साहेब ईशाती अध्यक्ष जमियत उलेमा औसा, मौलाना कारी मोहम्मद रफिक सिराजी अध्यक्ष मदरसा सिराजुल बनात औसा, मौलाना कलीमुल्ला साहेब कादरी अध्यक्ष मजलिस उलेमा औसा यांच्या उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना मौलानांनी वेगवेगळ्या विषयावर आपली मत व्यक्त केले. पैगंबरांनी आम्हाला जो उपदेश केला आहे तो फक्त ऐकण्यासाठी केला नाही तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणून त्याप्रमाणे वागले पाहिजे. देशासह विदेशातील जे नागरिक अडचणीत आहेत त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या प्रार्थना यावेळी करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या