शेतकरी प्रगती बचत गटाची बैठक उत्साहात संपन्न..
औसा प्रतिनिधी
शेतकरी प्रगती बचत गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने 8 सप्टेंबर रविवार 2024 रोजी दुपारी प्राप्ती हॉटेल येथे बचत गटाची
5 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल सर्वसाधारण सभेची बैठक घेण्यात आली. 15 ऑगस्ट 2019 साली अगदी मोजक्या,500 रुपये पासून मासिक बचत चालू करून आपल्या जवळच्या विश्वासू बांधवांसाठी काही तरी करावे ही संकल्पना संजय सगरे सर, रामभाऊ कांबळे यांनी मांडली.आपण दररोज एकत्र राहतो, वावरतो. पण एकमेकांच्या अडीअडचणीत आर्थिक मदत होईल या दृष्टीने बचत गट काढण्याची संकल्पना मांडली.त्यास प्रा.काशीनाथ सगरे, विनायक मोरे, रामभाऊ कांबळे यांनी प्रत्येक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केला.व तो यशस्वी ही झाला .15 सदस्यांवर सुरू झालेल्या या शेतकरी प्रगती बचत गटाला 5 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाली. सर्व विषयावर चर्चा करण्यात आली आणि या बैठकीमध्ये आर्थिक व्यवहाराचा हिशोब पूर्णपणे सभासदांना गटाचे अध्यक्ष ,सचिव यांनी सांगितले. बैठक अतिशय आनंदमय आणि उत्साहपूर्वक वातावरणात पार पडली. अतिशय मोलाचे योगदान संजय सगरे सर आणि रामभाऊ कांबळे यांनी बचत गटासाठी दिले त्याबद्दल गटातर्फे मनःपूर्वक आभार तसेच सर्व सभासद बैठकीसाठी वेळेवर उपस्थित झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार. बचत गटाच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा...
गटाचे सन्माननीय सदस्य श्री बनाळे सर यांची स्वामी रामानंद तीर्थ गृहनिर्माण सोसायटी च्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शेतकरी प्रगती बचत गट तर्फे शाल व पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संजीव सगरे सर, काशीनाथ सगरे, रमेश दुरुगकर, विनायक मोरे, रामभाऊ कांबळे,बालाजी उबाळे, विठ्ठल पांचाळ,एम बी मणियार,गिरीधर जंगाले,अनील लसणे, नागनाथ बुरांडे, दिनेश बंडूरे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या